|
|
|
- जिल्हा कृषि संशोधन व विस्तार नियोजन याचा आढावा
घेणे व विविध सहभागी घटकांनी सादर केलेल्या वार्षिक कृती आराखड्यास मंजूरी देणे.
- जिल्हयाअंतर्गत विविध सहभागी घटकांनी राबविलेल्या
कृषि संशोधन व विस्तार कार्याचा अहवाल व आढावा घेणे व गरजेनुसार त्यांना मार्गदर्शन
करणे..
- जिल्हयाअंतर्गत कृषि संशोधन व विस्तार आणि इतर
कार्यक्रमांतर्गत निधि स्विकारणे व प्रकल्पानुसार वाटप करणे.
- शेतकरी समूह विकास व शेतकरी गट बांधणीसाठी देणे
- शेतकर्यांना निविष्ठा, तांत्रिक सहाय्य, कृषि
प्रक्रिया आणि पणन सेवा देण्यासाठी खाजगी क्षेत्रांना व इतर संघटनांचा जास्तीत जास्त
सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे
- सिमांत शेतकरी, अनुसूचित जाती व जमाती शेतकरी,
महिला शेतकरी यांना कृषि पत पुरवठा दार संस्थांनी जास्तीत जास्त मदत देणे संबंधी प्रोत्साहन
देणे
- कृषि सलग्न विभाग, कृषि विज्ञान केंद्र आणि प्रादेशिक
संशोधन केंद्र यांनी शेतकरी सल्ला समिति स्थापन करून त्यांचे मूल्यमापन करणे संदर्भात
मार्गदर्शन करणे व त्याबाबतचे नियोजन संबधित संशोधन विस्तार कार्यक्रमांतर्गत करणे.
- जिल्हातील कृषि विकासास उत्तेजन देणे व सहाय्य
करणे व आवश्यक तेथे योग्य करार करणे.
- आत्मा आणि सहभागी घटकांच्या शाश्वत आर्थिक घडीसाठी
उपलब्ध स्त्रोतरांची ओळख करून घेणे
- उपलब्ध मनुष्यबळ व आर्थिक तरतुदीचा योग्य ताळमेळ
घालून केंद्र शासनाच्या कृषि व सहकार विभागांतर्गत विविध कार्यक्रम व योजना उपयोगात
आणणे.
- आत्मा लेखासंबंधी लेखा परीक्षण करणे
- आत्म्याचे नियम आणि उपनियम स्विकारणे व दुरुस्त
करणे
- प्रत्येक तीन महिण्यांनी आत्मा नियामक मंडळ बैठकीचे
आयोजन करणे
- जिल्हया मध्ये आत्मा प्रभावशाली अंमलबजावणीसाठी
आवश्यक ती कार्यावाही करणे
|