आंतर विभागीय कार्यकारी गटाची कार्ये-
  • राज्य कृषि विस्तार कृति आराखडा शिफारस तथा मंजुरीसाठी राज्यस्तरीय अनुज्ञा समीतीसमोर किंवा तांत्रिक विभाग कृषि व सहकार विभाग यांचे समोर ठेवणे.
  • राज्य मुख्यालय कक्षाचे संनियंत्रण तथा सहाय्य करणे यामध्ये वेळेवर प्रस्तावांची मंजूरी घेणे व पुढील कार्यवाही करणे इ. चा समावेश होतो.
  • राज्य शासनाअंतर्गत कृषि संलग्न विभाग, संशोधन क्षेत्र आणि केंद्राच्या कृषि व सहकार विभागामध्ये समन्वयक कार्यप्रणाली विकसित करणे.
  • मानव संसाधन विकास/क्षमता विकासाबाबत राज्यस्तरीय समीती/कार्यकारी समीती, सामेतीस मार्गदर्शन करणे.
  • चेअरमन, आत्मा नियामक मंडळ यांना दैनंदिन आत्मा कार्यक्रम राबविणेबाबत मार्गदर्शन करणे.
  • मास मिडीया योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या राज्यस्तरीय समीतीस मास मिडीयाच्या मदतीने माहिती प्रसारीत करणेसंबंधी मार्गदर्शन करणे.
  • आवश्यकता व गरजेनुरूप वेळोवेळी उत्पन्न झालेल्या इतर धोरणात्मक मुद्यासंदर्भात मार्गदर्शन करणे.