|
|
आत्मा व्यवस्थापन समितीची कार्ये
|
|
- जिल्हातील विविध सामाजिक आर्थिक समुह आणि शेतकरी
यांना आसणार्या समस्या व अडचणी जाणून घेणे.
- जिल्ह्याचे एकात्मिक संशोधन कृषि विस्तार नियोजन
करणे ज्यामध्ये लघु आणि मध्यम स्वरूपाचे तंत्रज्ञान प्रथम प्राधान्याने घेता येईल.
- जिल्हा शेतकरी सल्ला समितीच्या मदतीने वार्षिक
कृती आराखडा तयार करणे जो आत्मा नियामक मंडळासमोर आढावा देणेसाठी व आवश्यक बदल करण्यासाठी
तथा मंजुरीसाठी ठेवता येईल.
- लेखा परीक्षणासाठी आवश्यक ते प्रकल्प लेखा जतन
करणे.
- सहभागी कृषि सलग्न विभाग, प्रादेशिक संशोधन केंद्र,
कृषि विज्ञान केंद्र, बिगर सरकारी संघटना, खाजगी संस्था यांच्यात समन्वय ठेऊन वार्षिक
कृती आराखडा राबविणे.
- तालुका व गांव पातळीवर शेतकरी माहिती व सल्ला
केंद्र स्थापन करणे व त्याद्वारे एकात्मिक कृषि विस्तार व तंत्र ज्ञान प्रसार कार्यक्रम
राबविणे.
- नियमित कार्यवाही अहवाल प्रत्यक्ष लक्ष साध्यासह
आत्मा नियामक मंडळास पाठविणे जो नंतर कृषि व सहकार मंत्रालयास पाठविला जाईल.
- आत्मा नियामक मंडळाने स्विकारलेली धोरण, गुंतवणुकी
संबंधाचे निर्णय व केलेल्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम अंमलबजावणी करणे.
- आत्मा व्यवस्थापन समितीची जिल्ह्यातील विविध तालुक्याचा
आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्यात एक आढावा बैठक होणे व सदरील बैठकीचा अहवाल राज्य
मुख्यालय कक्षास पाठविणे.
|